न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२५) :- एक्सपायरी झालेले कुरकुरे खाल्ल्यामुळे जुलाब आणि उलटी झाल्याचा त्रास झाला. त्यामुळे दुकानदाराला मीडिया बोलवून दुकान कायमचे बंद करण्याची तिघांनी धमकी दिली.
प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला ५० लाखांच्या खंडणीची मागणी दुकानदाराकडे केली. त्यानंतर त्यांची मागणी टप्प्याटप्प्याने कमी होत गेली. शेवटी अडीच लाख रुपये दुकानदारांकडून त्यांनी घेतले आहेत.
हा प्रकार तळवडे येथील एका किराणा मालाच्या दुकानात घडलेला आहे. याप्रकरणी किराणा विक्री करणारे रमेश कुमार चौधरी यांनी भूषण पाटील, राहुल पाटील आणि सुभाष पाटील (सर्व राहणार तळवडे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.