- महामेट्रोकडून प्रत्यक्षात डीपीआरच्या कामाला प्रारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २३ जानेवारी २०२५) :- रावेत येथील मुक्ताई चौक ते वाकड आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम महा-मेट्रोने सुरू केले आहे. येत्या काही दिवसांनी या मार्गाचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर हा डीपीआर मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला जाणार आहे. याला मंजुरी मिळाली की त्यानंतर या मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे एमडी श्रावण हर्डीकर यांनी सांगितली आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आणखी एक महत्त्वाचा भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. मुक्ताई चौक ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण या मार्गावरही भविष्यात मेट्रो धावणार आहे.
सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गांचा विस्तारही केला जात आहे. अशातच आता मुक्ताई चौक ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण यादरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.













