- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत आराखड्याला मंजूरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील हवा शुद्धीकरणावर उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १७२ कोटी ९७ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत १४ इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी महापालिका पीएमपीएलला ७ कोटी रुपये देणार आहे. खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत शहरातील हवा शुद्ध करणेकामी उपाययोजना करण्यासाठी १७२ कोटी ९७ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला.
यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे महापालिका यांच्याकडून पीएमपीएलसाठी १०० ईव्ही आणि १०० सीएनजी गॅस बसेसच्या खरेदीचे नियोजन आहे. त्यापैकी ६० टक्के बस पुणे महापालिका आणि ४० टक्के बस पिंपरी-चिंचवड महापालिका खरेदी करणार आहे. पीएमपीएलने मागणी केल्याप्रमाणे त्यांना १४ बसेससाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान वर्ग करण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली.
 
                                                                     
                        		                     
							













 न्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.
    न्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.