- नगरसेवकांचा कालावधी संपला मग, आम्हाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२५) :- कुदळवाडीतील विठ्ठल मंदिर येथे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत माजी स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्या माध्यमातून नागरिकांची बैठक पार पडली. बैठकीस क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर विभागीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यतः कचरा, रस्ते सफाई या समस्यांवर चर्चा झाली.
नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपला आहे. कामाचे पारंपरिक स्वरूप बदलून ती अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हायला हवीत. महिन्यातील एक बैठक महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतमध्ये घेण्यात यावी. जिथे नागरिक आपल्या समस्या मांडू शकतील.
प्रभागात कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची कल्पना नागरिकांना बैठकीमध्ये देण्यात यावी. कामाच्या माहिती संदर्भातील सर्व तपशील काम चालू करण्यापूर्वी कामाच्या ठिकाणी लावण्यात यावे. पूर्ण झालेल्या कामाचे ऑडिट करण्यात यावे. कुदळवाडी परिसरातील वसाहतींमध्ये फायर ऑडिट करण्यात यावे, अशा मागण्या बैठकीत नागरिकांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.













