न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२५) :- अवैध गॅस रिफिलींग करणाऱ्या टोळीवर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मोठा छापा मारला असून एकुण ८,३२,५००/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांनी हि कारवाई केली आहे.
गल्ली नं २, पवार वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या नोझलच्या सहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या लहान मोठ्या गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करुन त्याची विक्री करीत होते. याप्रकरणी आरोपी १. शशिकांत शंकर भांगरे, वय ४३ वर्षे, रा साई कॉलनी, चिखली, २. सागर सुर्यकांत मिरगाजी, वय २६ वर्षे, रा. बालघरे वस्ती. चिखली, ३. अमर महादेव साठे, वय २९ वर्षे, रा भिमशक्ती नगर, मोरे वस्ती, चिखली, ४. योगेश गंगाधर गुंडले, वय १९ वर्षे, रा जाधववाडी, चिखली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय राजेंद्र जैन (चिखली) यांच्या सांगणेवरुन ही टोळी गॅस रिफिलिंग करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पत्र्याच्या शेडमध्ये काही अर्धवट भरलेले व रिकामे सिलेंडर तसेच गोडावुनमध्ये उभ्या असलेल्या दोन टेम्पो मध्ये देखील अर्धवट भरलेले व रिकामे सिलेंडर असे एकुण १२६ गॅस सिलेंडर व ०२ टेम्पो असा एकुण ८,३२,५०० रु किं चा मुद्देमाल पंचनाम्याने हस्तगत करण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईकरीता आरोपी व मुद्देमाल चिखली पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहा पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, पोशि विनोद वीर, समीर रासकर, अमर कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार यांनी केली आहे.














