न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२५) :- अहिल्यानगर येथे झालेली ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही मोठ्या वादामुळे चर्चेत आहे. गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) यांच्यात झाली, ही लढत अतिटतीची सुरू होती. तेव्हा मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला थेट बाद घोषित केले. त्यामुळे ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण, शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयाला विरोध केला नंतर हा वाद पेटला.
सामना संपल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर थेट लाथ मारली. आता या घटनेवर आजी-माजी कुस्तीपटू आणि पंचांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया मोठी दिली आहे. शिवराज राक्षेने लाथ घातली ही चूक झाली. पण जो कालच्या सामन्यात पंच होता, असल्या पंचाना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले.
महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले की, पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यावेळी शिवराज राक्षेने लाथ मारून चूक केली, खरं तर त्याने पंचाना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो, त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो.
एवढेच नाही तर शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर एक कोटीचे बक्षीस देईल असं शिवराजचे प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी जाहीर केल आहे. तसेच काका पवार तालमीला बदनाम करण्याचे षडयंत्र काही लोक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर शिवराज राक्षे यांचे भाऊ युवराज राक्षे यांनी शिवराज राक्षेच्या अनेक कुस्त्यांचे दाखले देत शिवराजचा खेळ आणि स्वभाव सांगत पंचांनी दिलेला चुकीचा निर्णय आहे असं म्हंटल आहे. सोबतच शिवराजला पंचांकडून शिवीगाळी झाल्यामुळेच त्यावर पंचाला लाथ मारण्याची वेळ आली असं म्हटलं आहे.

















1 Comments
Armand Sherbert
Hello, Neat post. There is a problem along with your site in web explorer, could test this… IE nonetheless is the market chief and a huge portion of other folks will leave out your wonderful writing because of this problem.