- भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते तिचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२५) :- पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल आयोजित “पीडीसीसी” च्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत नऊ आणि अकरा वर्षाखालील मुलींच्या गटात पिंपळे सौदागरची कन्या शालवी चासकरने प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ट्रॉफी देऊन सन्मानित केले.
पिंपळे सौदागर मधील लहान मुले तसेच युवा वर्ग क्रीडा प्रकारात करत असलेली प्रगती ही एक खूप समाधानाची बाब आहे. त्यांच्या खेळाडू वृत्तीला अजून चालना देण्यासाठी एक लोकसेवक या नात्याने सदैव प्रयत्नशील राहणार आहे. तसेच प्रभागातील विविध खेळात पारंगत असलेल्या खेळाडूंना पुढील वाटचाल सोयीस्कर व्हावी यासाठी पुढाकार घेणार आहे, असे सांगत शत्रुघ्न काटे यांनी शालवी चासकर हीचे कौतुक आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या तिच्या आई वडीलांचे विशेष अभिनंदन केले.
आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या खेळात सहभाग घेण्यापासून मज्जाव न करता त्यांना आपला पूर्ण पाठिंबा देऊन त्यांच मनोधर्य उंचावणे हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली असते, असेही ते म्हणाले.