- सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे रोकड वाचली; परप्रांतीय गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२५) :- दोघांनी मिळून बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे एकजण पळून गेला. तर, एकाला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी (दि. २०) सकाळी अकरा वाजता घडली. लखवीरसिंग बलदेव सिंग (रा. पंजाब) याला अटक केली आहे. त्याच्यासह अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सयाजी लक्ष्मण बर्गे (५४, रा. काळेवाडी) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिंचवड सहकारी बँकेच्या चाकण शाखेत काम करतात. गुरुवारी सकाळी बँकेत आल्यानंतर त्यांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकाला बँक आणि एटीएम सेंटर मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर निगराणी ठेवण्यास सांगितले. सकाळी अकरा वाजता एटीएम सेंटरमध्ये दोन चोरटे आले. त्यांनी एटीएमचा पुढील ड्रॉवर बनावट चावीच्या सहाय्याने उघडला.
आतील तिजोरी फोडत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर निगराणी ठेवणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने बँकेतील कर्मचाऱ्यांना एटीएम सेंटरमध्ये चोरी होत असल्याचे सांगितले. बँकेतील कर्मचारी एटीएम सेंटरमध्ये आले. त्यावेळी एकजण पळून गेला. तर, एकाला बँकेतील कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चाकण पोलिस तपास करीत आहेत.












1 Comments
✉ Email- Transaction №GI80. RECEIVE =>> https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=eb59769e38e4c1486403657a880e8964& ✉
7o8dft