न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘पवनाथडी’ जत्रेचे उदघाटन सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आणि आमदार उमा खापरे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार आण्णा बनसोडे यांच्या पत्नी प्रिया बनसोडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसदस्य राजेंद्र राजापुरे,सागर आंघोळकर, धनराज बिर्दा,माजी नगरसदस्या माई काटे, सविता खुळे,उषा मुंढे, चंदा लोखंडे, शमीम पठाण, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्यासह विविध महिला बचत गटांतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवनाथडी जत्रेत ७५० हुन अधिक स्टॉल लावण्यात आले असून यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येतात. पुढील चार दिवस या जत्रेत महिलांनी तयार केलेली उत्पादने, विविध खाद्य पदार्थ, विक्रीसाठी असणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची गौरवधारा , मेरा भारत महान, जागर स्त्री शक्तीचा सुर गृहलक्ष्मीचा, जगत सुंदरी असे विविध कार्यक्रम होणार आहेत.











