- कासारसाई येथील व्हिलावर पोलिसांचा छापा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२५) :- परदेशी महिला दलाल ही ग्राहकांना व्हाट्सअॅप कॉल द्वारे लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगते. तेथे परदेशी महिलांना घेवुन त्यांना पैशाचे अमिष दाखवुन वेश्याव्यवसाय करुन घेते, अशी माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागास मिळाली होती.
दरम्यान घटनेचा छडा लावण्यास पोलिसांनी बनावट ग्राहक तिथे पाठवला. त्याने कासारसाई येथील व्हिला बुक केला. त्यावेळी परदेशी एजंट महिलेने ०४ परदेशी पिडीत महिला तिथे नेल्या. दरम्यान रात्री अकरा वाजेच्या सुमारास सुर्य विला येथे छापा टाकुन ०१ परदेशी महिला दलालास ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकुन २०,०२० रु किं. मुद्देमाल हस्तगत करुन ०४ परदेशी पिडीत महिलांची सुटका करण्यात आलेली आहे. याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेष घाडगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि दिगंबर सूर्यवंशी, सहा पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाट, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, मुकुंद वारे, महिला पोलीस अंमलदार श्रध्दा भरगुडे, निलम बुचडे, संगिता जाधव यांनी केली आहे.