- झेंडेमळ्यातील स्थानिक शेतकऱ्याच्या शेतातून अफुची २१८ झाडे जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २७ फेब्रुवारी २०२५) :- देहुतील चिंचोली रोडवरील झेंडेमळा परिसरातील काळोखे मळा व हगवणे मळा सी.ओ.डी. भिंतीमागे असलेल्या कांद्याच्या शेतामध्ये अफुची झाडे लावलेली होती.
कांद्याच्या शेताची पोलिसांनी पाहणी केली असता शेतामध्ये अफुची लागवड केली असल्याचे समोर आले. याप्रकरणी स्थानिक दिलीप चंद्रकांत काळोखे (वय ५७ वर्षे, रा मु. काळोखे वस्ती, देहुगाव) याच्या मालकीचा शेतातून एकुण ३,२७,००० रुपये किंमतीची अफु या अंमली पदार्थाची फुले, बोंडे आलेली हिरवीगार २१८ झाडे जप्त करण्यात आली आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने पेट्रोलींग दरम्यान ही कामगिरी केली आहे.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, बाळासाहेब कोपनर सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, किशोर परदेशी, जावेद बागसिराज, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, राजेंद्र बांबळे यांच्या पथकाने केली आहे.