न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२५) :- न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्या हस्ते सर चंद्रशेखर वेंकटरमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. २१ वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे.
नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते. याविषयी सचिन कळसाईत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिंपल काळे गीतांजली दुबे यांनीही विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सूत्रसंचालन पूजा देवगिरी यांनी तर गीतांजली दुबे यांनी आभार मानले.