न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०१९) :- आरोपी सिद्धांत याने फिर्यादी रोहितच्या दुचाकीला कट मारला. रोहितने याचा जाब विचारला असता आरोपी राजकिरण याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच सिद्धांत याने रोहितच्या गालावर चावीने वार करून त्यास जखमी केले.
ही घटना जुनी सांगवी येथे घडली. रोहित दुर्गेश धर्माधिकारी (जुनी सांगवी) याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सिद्धांत निकाळजे, राजकिरण घुटे (जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.











