न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०१९) :- पोलीस उपनिरीक्षक हनुमांत बांगर यांना माहिती मिळाली की, रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगार पिस्तुलासह कस्पटेवस्तीकडून हिंजवडीच्या दिशेने बुलेट वरून जात आहे.
त्यानुसार वाकड पोलिसांनी वाकड ब्रिज येथे सापळा रचून विक्रांत याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. ही कारवाई वाकड पोलिसांनी आज शनिवार (दि. १८) रोजी दुपारी पाचच्या सुमारास कस्पटे वस्ती येथे केली.
विक्रांत सुभाष कांबळे (वय २०, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तो देहूरोड परिसरातील रावण साम्राज्य टोळीतील सदस्य असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी विक्रांतला अटक केली. वाकड पोलिस पुढील तपास करीत आहेत.











