न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२५) :- राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांची वेतवाढ, थकबाकी, महागाई भत्ता आदी मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर ५ मार्च रोजी राज्यातील सर्व बस स्थानके आणि आगारांच्या बाहेर निदर्शने करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.
अनेक मागण्यांबाबत कामगार संघटनांकडून वारंवार बैठका घेऊन आश्वासने देण्यात आली आहेत. अद्याप याबाबत कुठलाच निर्णय घेतला जात नसून, संघटनेकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व आगारांच्या बाहेर मागण्यांसंदर्भात निदर्शने करण्यात येणार आहेत, असे पुणे संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विशेषत: कामगारांना ५० टक्के महागाई भत्ता लागू झाला असताना अद्याप अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने पाच मार्च रोजी आगारांच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटना…










