- महावितरणची प्रस्तावित दरवाढ चिंताजनक – संदीप बेलसरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२५) :- देशभरात विजेचे दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. आता पुन्हा महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (MERC) खुल्या व छुप्या पद्धतीने वीज दरवाढ मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे. सुनावणीलाही सुरुवात झालेली आहे. दरम्यान महावितरणने प्रस्तावित केलेल्या वीज दरवाढीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचा प्रखर विरोध केला आहे. महावितरणने ही छुपी दरवाढ पूर्णपणे रद्द करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी महावितरणकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, ”महाराष्ट शासनाचे औद्योगिक विकासाला चालना देण्याचे धोरण असताना महावितरण मात्र, वारंवार वीज दरवाढ करून या धोरणास बाधा आणत आहे. वीज चोरी, वीज गळती, TRANSMISSION LOSSES, विद्युत निर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता, प्रशासकीय खर्च, खाजगी कंपन्याकडून वीज विकत घेण्याचे दर, आदी महत्वाच्या मुद्द्यावर प्रभावी मनुष्यबळ व्यवस्थापनाद्वारे महावितरणने यंत्रणा सुधारणेसाठी लक्ष केंद्रित करावे. कार्यक्षमता वाढवून आर्थिक शिस्त आणणे गरजेचे आहे. या कळीच्या मुददयांकडे डोळेझाक करून वारंवार वीज दरवाढ करणे हा उपाय घातक आहे.
देशामध्ये महाराष्ट राज्य औद्योगिकरणात आजही अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे कर संकलन व रोजगार निर्मिती प्रचंड होत असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. अशा औद्योगीकरणाला महावितरणने रास्त दरात वीज उपलब्ध करून हातभार लावणे आवश्यक आहे. त्यामुळे महावितरणने प्रस्तावित केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचा या प्रस्तावित वीज दरवाढीस प्रखर विरोध आहे. महावितरणने ती पूर्णपणे रद्द करावी, असे या पत्रकात म्हटले आहे.
प्रस्तावित दरवाढीत स्थिर आकारात वाढ केली आहे. त्यामुळे वीज दरात वाढ होईल. WHEELING CHARGES वाढणार आहेत. TOD (TIME OF DAY TARIFF) चे धोरण, GRID SUPPORT CHARGES मध्येही वाढ होईल. GREEN TARIFF CHARGES मध्ये वाढ, FAC – FUEL ADJUSTMENT CHARGES मध्ये वाढ, LT उद्योगांना KVAH BILLING मुळे वाढ, LT उद्योगांना PFC (POWER FACTOR INCENTIVE) चा लाभ नाही. त्यामुळे लघुउद्योग, MSME, COTTAGE INDUSTRIES व START UPS उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होणार. ROOF TOP SOLAR धारकांना LOAD FACTOR INCENTIVE आता मिळणार नाही. SOLAR वापरणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. BULK CONSUMPTION मधील सवलत रद्द होणार आहे. ज्यांचा वीज वापर जास्त आहे त्यांना मिळणारी सवलत आता रद्द होणार आहे. ELECTRICITY DUTY पण वाढणार आहे, त्यामुळे वीज ग्राहकाना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे आताच्या प्रस्तावित दरवाढीतील वरील मुद्दे चिंताजनक आहेत.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष – पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना…










