न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२५) :- डूडूळगावातील फॉरेस्टच्या डोंगराजवळ ३४ वर्षीय आमुसाब मुल्ला याचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राच्या सहाय्याने पोटावर वार करून त्याचा खून केला होता. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा, युनिट ३ व गुंडा विरोधी पथकाने संयुक्त कामगिरी करून या खुनाचा उलगडा केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल मकबुल मलिक (वय ४५ वर्षे, सध्या रा. डुडुळगांव, मुळ उत्तरप्रदेश) आणि मयताची पत्नी जेबा अमुदसाब मुल्ला (वय ३० वर्षे रा. डुडुळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अब्दुलला गोंडा, उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताची पत्नी जेबा आणि अब्दुल या दोघांचं प्रेम प्रकरण होत. ते दोघेही लग्न करणार होते. दरम्यान प्रेसयीच्या सांगण्यावरुन मयत आमुसाब मुल्ला यास अब्दुलने निर्जन ठिकाणी नेवून त्याचा चाकुने वार करुन खुन केला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी दिघी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. हा प्रकार (दि. २८ फेब्रुवारीला घडला होता. याप्रकरणी मयत तरुणाचे वडील साहेबलाल (वय ५६ वर्षे) यांनी फिर्याद नोंदविली होती. त्यानुसार दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम गुंडा विरोधी पथक सपोनि. हरीश माने, पोलीस अंमलदार त्रिनयन बाळसराफ, रामदास मेरगळ, यदु आढारी, संदिप सोनवणे, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, तसेच गुंडा विरोधी पथकाकडील अंमलदार गंगाराम चव्हाण, विजय गंभीर, ज्ञानेश्वर गिरी, गणेश मेदगे यांनी केली आहे.















