न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या धरणातील पाणीसाठा केवळ २३.१६ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्के कमी पाणीसाठा आहे.
त्यामुळे ३० जूनपर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून रावेत बंधा-याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. दररोज महापालिका ४३० ते ४४० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी पवना धरणातून उचलते. गेल्या पावसाळ्यामध्ये धरण शंभर टक्के भरले होते. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने धरणातील भागात पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात झाली.


















