न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आजी-आजोबांकडे राहण्यासाठी आलेल्या नातवाने पाणी पिण्यासाठी फ्रीज उघडला. गॅस गळतीमुळे फ्रीजचे दार उघडताच आगीचा भडका उडाला. नातवाने पळत जाऊन सर्वाना झोपेतून उठवून घराबाहेर काढले. त्यानंतर काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये लाखोंचे सामान जळून खाक झाले.
मात्र, नातवाच्या सतर्कतेमुळे घरातील सहा जणांचे प्राण वाचले. ही घटना शनिवारी (दि. १९) रात्री दोनच्या सुमारास कासारवाडीतील सागर हाईट्स येथे घडली. मॅक्स पॉल चाबुकस्वार (वय ८) असे या नातवाचे नाव आहे.















