न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समित्यांचा एक वर्षांचा कालावधी बुधवारी (दि. ८) रोजी संपल्याने त्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.
नव्या सदस्यांच्या निवडी आज सोमवार (दि. २०) रोजी होणा-या पालिकेच्या सर्व साधारण सभेत होणार आहेत. पालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचा एका वर्षांचा कालावधी संपला आहे. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे ५, राष्ट्रवादीचे ३ व शिवसेनेच्या एका नगरसेवकांस समितीवर संधी मिळणार आहे.











