- ५३ दुचाकी जप्त; ३५ गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२५) :- दुचाकी चोरणाऱ्या एका अभियंत्यासह तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २६ लाख दहा हजार रुपये किमतीच्या ५३ दुचाकी जप्त केल्या. तसेच दुचाकी चोरीचे पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर, कोल्हापूर व सातारा येथील ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
संतोष मारुती शिंदे (वय ३२, रा. वाकड), धीरज प्रदीप सावंत (वय २३, रा. नऱ्हेगाव, पुणे), बालाजी उर्फ तात्यासाहेब दादा भोसले (वय २४, रा. शाहूपुरी, सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील धीरज हा अभियांत्रिकी अभियंता आहे.
या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील २५, पुणे शहरातील चार, कोल्हापूर येथील दोन आणि सातारा येथील चार असे एकूण ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) धनंजय कापरे, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, हांडे, पोलीस हवालदार बेंदरकर, बारशिंगे यांच्या पथकाने केली.















