न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२५) :- ‘काय बघतोस,’ असे बोलून शिवीगाळ करून वॉर्डनला बेदम मारहाण केली. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. निगडी प्राधिकरणातील हॉटेल कृष्णा व्हेज येथे सोमवारी (दि. १० मार्च) रात्री ११ वाजता ही घटना घडली.
पृथ्वी अशोक येळवंडे (१९), प्रथमेश राजेंद्र पानसरे (२१, दोघे रा.निघोजे, ता.खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कृष्णा पांडुरंग क्षिरसाठ (२०, रा. रूपीनगर, तळवडे) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (१४ मार्च) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा क्षिरसाठ हे वॉर्डन म्हणून नोकरी करतात. ते १० मार्च रोजी प्राधिकरण निगडी येथील हॉटेल कृष्णा व्हेज येथे जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या समोरील टेबलवार संशयित पृथ्वी येळवंडे आणि प्रथमेश पानसरे हे जेवण करीत होते. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. काय बघतोस, असे बोलून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. स्टीलचे ताट फेकून मारले, तसेच स्टीलच्या जगने फिर्यादी कृष्णा यांच्या डोक्यात सात ते आठ वेळा जोरात मारून त्यांना गंभीर दुखापत केली. येथे मारून टाकू, अशी धमकीही दिली.