- पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील घटना; चौघे गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२५) :- अज्ञात कारणावरून पिंपरीतील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांनी संगनमत करीत मयत तरुणासह आणखी एकाचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ रेकॉडींग करीत त्यांचे फोटो काढले. ते रेकॉर्डंग व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची मयत तरुणाला धमकी दिली.
दरम्यान तरुणाकडे त्यांनी ५०,००० रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. तरुणाकडून ३५,५०० रूपये खंडणी स्वरूपात घेवुन आणखी पैशाची त्याच्याकडे केली. मयत तरुणाचा मानसिक छळ केल्याने तरुणाने दि. २४ फेब्रुवारी रोजी सायं. ०६.१० वाजताच्या सुमारास मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यास सहा जणांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे.
हा प्रकार स्नेह बंगला, महेशनगर, पिंपरी आणि संत तुकाराम नगर पिंपरी येथील मेट्रो स्टेशन येथे घडला. याप्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांनी आरोपी १) प्रणव किशोर शिंदे, २) नितीन पाटील, ३) लोपेश राजु पाटील, ४) संदिप रोकडे, ५) आकाश चौरे, ६) प्रथमेश जाधव यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
त्यानुसार पिंपरी पोलिसांनी आरोपी ३ व ६ यांना अटक केली आहे. चिरंजीव दलालवाड, पोलीस उपनिरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन हे पुढील घटनेचा तपास करीत आहेत.















