न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२५) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन व प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बीएड चे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट पाठ सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रथम क्रमांक पुणे येथील अरिहंत शिक्षण शास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृतिका कानिटकर हिने पटकाविला. फिरता चषक, रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.
दुसरा क्रमांक पुणे येथील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची पूर्वा अंबाडेकर व तृतीय क्रमांक प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाची सोनल अग्रवाल यांना मिळाला, तर उत्तेजनार्थ पुरस्कार पूजा कुमारी स्पायसर अडवेंटेड युनिव्हर्सिटी, पूनम जयस्वाल जैन शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांना मिळाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विजेत्याना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक, भेटवस्तु देण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण तज्ञ डॉ दत्तात्रय तापकीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी थेरगाव येथील खिंवसरा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक नटराज जगताप, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. आस्मिता यादव परीक्षक अनिता खैरे, डॉ. शितल देवळाकर आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी केले. प्रस्तावना व आभार समन्वयीका प्रा. अस्मिता यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. गीता कांबळे, प्रा. मनीषा पाटील, प्रा. सुशील भोंग, प्रा. संतोष उमाटे आदींनी विशेष परीश्रम घेतले.