न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२५) :- मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांकरीता ०७ कलमी कार्यक्रमाचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दाखल असलेल्या एन.डी.पी.एस. गुन्हयांमधील मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेशीत केले होते.
त्यासाठी अध्यक्ष वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, सदस्य विवेक पाटील पोलीस उपायुक्त (मुख्यालय), सदस्य स्वप्ना गोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ १, संदिप डोईफोडे पोलीस उपायुक्त (गुन्हे), (पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे प्रतिनिधी) यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत एनडीपीएस गुन्हयामधील जप्त अंमली पदार्थ नाश करण्यासाठी समिती तयार केली.
दरम्यान (दि. १७) गठित समिती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे, राज्य उत्पादन शुल्क पुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे यांचे प्रतिनिधी यांनी राजंणगाव एम.आय.डी.सी. येथील Maharashtra Enviro Power ltd, Plot no. P-56, Ranjangoan MIDC, Tal. Shirur, Dist. Pune येथे प्रत्यक्ष हजर राहुन भट्टीमध्ये एकुण ६८३ किलो ८३० ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा हा अंमली पदार्थ जाळुन नाश केलेला आहे.
ही कार्यवाही विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), विवेक पाटील पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय), स्वप्ना गोरे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१, बाळासाहेब कोपनर सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ०२ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांबळे, पोलीस हवालदार किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, पोलीस शिपाई संतोष स्वामी, सदानंद रुद्राक्षे, रणधीर माने, कपिलेश इगवे यांनी केली आहे.
















