न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- बंगळुरू-मुंबई बाह्यवळण महामार्गावरील शितळानगर येथील छेदरस्ता सोमवारी महामार्ग प्राधिकरणाकडून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे धोकादायकपणे रस्ता ओलांडण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. मात्र, भुयारी मार्गावर वाहतुकीचा ताण वाढणार आहे.
बाह्यवळण महामार्गावरील देहरोडकडून शितळानगर, मामुर्डीकडे जाताना पादचारी तसेच वाहनांना महामार्गावर छेदरस्ता ठेवण्यात आला होता. सदोष सिग्नल यंत्रणा, महामार्गावर दोन्ही बाजूंना बसविण्यात आलेल्या वेग नियंत्रकांची दुरवस्था यामुळे महामार्गावरून भरधाव येणा-या वाहनांची रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांना धडक बसून वारंवार अपघात घडत होते.
या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ताच बंद केला. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा शालेय विद्यार्थ्यांना होणार आहे. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचा मात्र या कामाला विरोध आहे.


















