न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची राज्याबाहेर निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हे दोन्ही अधिकारी सदर कामकाज मंगळवार (दि. २१) पासून पाहणार आहेत.
त्या काळात अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे हे आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार सांभाळणार आहेत. आयुक्त हर्डीकर यांची उत्तर प्रदेश राज्यात आणि अतिरिक्त आयुक्त पाटील यांची आंध्रप्रदेश राज्यातील एका लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सदर कामकाज ते मंगळवार (दि. २१) ते शुक्रवार (दि. २४) असे ४ दिवस पाहणार आहेत.
त्या काळात आयुक्तांचा प्रभारी पदभार गावडे यांच्याकडे राहणार आहे. ते धोरणात्मक आणि तातडीच्या फायलीवर आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत, असे आयुक्तांनी सोमवारी (दि. २०) रोजी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.















