न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- राहत्या घरात ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन एका वीस वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. पिंपरीतील अशोक टॉकिज नजीकच्या सोसायटीत हा प्रकार सोमवारी (दि. २०) रोजी दुपारी उघडकीस आला.
दरम्यान, तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. राजसी संजय क्षीरसागर (वय २०, रा. जास्वंद निवास, पिंपरी) असे त्या तरुणीचे नाव आहे. राहत्या घरात पंख्याच्या बाजूला असलेल्या हुकाला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली, ती एका खासगी कंपनीत कामाला होती. दरम्यान , मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट आढळली असून, त्यात कोणास मृत्यूस जबाबदार धरू नये, असे लिहले आहे.











