न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कृष्णानगर चिखली, साने चौक, भाजी मंडई व मच्छी मार्केट या परिसरात सोमवारी (दि. २०) रोजी कारवाई करण्यात आली.
कारवाईत वाहतुकीस अडथळा करणारे ६ हातगाड्या, १० टप-या, १२ काउंटर व विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील गोदामात जमा करण्यात आले आहे.
कारवाईसाठी १ कनिष्ठ अभियंता, ३ बिट निरीक्षक, अतिक्रमण पथकाचे कर्मचारी व पोलिस उपस्थित होते. कारवाईसाठी १ क्रेन, ४ डंपर व ६ मजुरांचे सहाय्य घेण्यात आले.


















