न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने अखिल पिंपरी-चिंचवड शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सव रवीवार (दि. १७ ते १९ फेब्रुवारी) यादरम्यान सोहळ्याचे आयोजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज समाज प्रबोधन पर्वाचे उद्घाटन रविवार (दि. १७) रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते निगडीतील भक्ती- शक्ती समूह शिल्प उद्यानात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव राहणार आहे. यावेळी सायंकाळी पाच वाजता झी मराठी फेम शिवशाहीर देवानंद माळी यांचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे.
महानगरपालिकेचे सर्व पदाअधिकारी, अधिकारी व पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमी संघटना, गणेश मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले आहे.