न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख येथे मंगळवार (दि. ५) रोजी केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गंत उभारण्यात येणा-या १५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मैलाशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसदस्या आरती चोंधे, नगरसदस्य तुषार कामठे, संदिप कस्पटे, सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता संजय भोसले, संजय कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघाचे बाबासाहेब इंगोले, दामू शिंदे, आप्पा हरसुदे, रंगनाथ थोपटे, सुभाष रंगळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप कामठे, अमोल कामठे, विमल गायधनकर यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
१५ दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या मैलाशुध्दीकरण प्रकल्पास सुमारे ९ कोटी ६९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, मार्च २०२० अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे पिंपळे निलख परिसरातील जलनिसारण सुविधा विकसित होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.