न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च) :- महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशन व आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने ”सर्व जाती धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्या” चे आयोजन करण्यात आले आहे.
चिखली येथील जाधववाडीतील रामायण मैदानावर गुरुवार (दि. १४) रोजी सायं. ६ : १५ वा. श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्व चैतन्य परमपुज्य सद्गुरु श्री नारायण महाराज (आण्णा) यांच्या शुभाशिर्वादाने या सोहळ्यामध्ये ५१ जोडपी विधीवत विवाहबद्ध होणार आहेत.
साखरपुडा, हळदी, आणि लग्न असे या सोहळ्याचे स्वरुप आहे. लग्न झालेल्या जोडप्यांना नवीन संसाराला हातभार म्हणून आयोजकांतर्फे संसारोपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणच्या सोहळ्यात छुप्या पद्धतीने शुल्क आकारले जाते. तसेच केवळ विवाह लावून दिले जातात. मात्र, गरीबीमुळे विशेषत: मुलींना विवाहात हौसमौज करता येत नाही. याचमुळे साखरपुडा, हळद, असे सर्व विधी उत्साहापूर्ण वातावरणात करण्याचा निर्णय आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन व महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाऊंडेशन यांनी घेतला आहे.
या सोहळ्यास आमदार महेश लांडगे तसेच नारायणपूर येथील नारायण अण्णा महाराज, महापौर राहुल जाधव, प्रभागातील नगरसेवक, शिवांजली सखी मंचच्या संस्थापिका पूजा लांडगे, श्री. दत्त दिगंबर महिला नागरी सह. पत. च्या चेअरमन मंगल जाधव व परिसरातील लाखो नागरिक उपस्थित राहणार आहेत.