न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १२ मार्च) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने सेक्टर सहा मध्ये गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजित आहे. या गृहयोजनेत ३८४ सदनिका आणि १६ रोहाऊस बांधण्यात येणार आहेत. गृहयोजना होणा-या परिसराजवळ राहणा-या नागरिकांना उद्यान, खेळाचे मैदान, महापालिका शाळा, विरंगुळा केंद्र नाही. त्यामुळे प्रकल्प तेथून स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या विषयासंदर्भात प्राधिकरण कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका नम्रता लोंढे, नगरसेवक विक्रांत लांडे, संजय वाबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे यांनी “पेठ क्रमांक ११ किंवा १२ मध्ये हा प्रकल्प करावा. तिथे जागा शिल्लक आहे, असे सांगितले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी महापालिकेतर्फे जे काही करता येईल ते करण्याचे आश्वासन दिले.