न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी परिसरातील अनधिकृत भंगार गोदाम व इतर आस्थापनांवर धडक कारवाई केली. कारवाईच्या वेळी गैरहजर राहिल्याबद्दल विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता समीर दळवी यांच्यावर आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कारवाई केली आहे. त्यांना ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
कारवाईच्या वेळी क क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता समीर दवळी यांना सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांसह ३१ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत उपस्थित राहण्याबाबचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कारवाईच्या वेळेस ते हजर राहिले. ते उपस्थित नसल्याने महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी समन्वयाअभावी कारवाईस अडथळे निर्माण झाले होते.
कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्याचा खुलासा संयुक्तिक वाटला नाही. कामात अनास्था व बेफिकीरी दर्शविल्याने कार्यकारी अभियंता दळवी यांना आयुक्तांनी ५०० रूपये दंड केला आहे.













