न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२५) :- शहरातील सर्व होर्डिंगवर १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिने कालावधीत जाहिरात बॅनर लावता येणार नाही. या कालावधीत सर्व होर्डिंग जाहिरातविना असतील, असा निर्णय महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने घेतला आहे. शहरातील जाहिरात होर्डिंगचालक व धारक आणि आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेत बुधवारी झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला.
वादळी वारे, अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत होर्डिंगवर जाहिरात न लावता ते रिकामे ठेवावेत. होर्डिंगचे स्ट्रक्चर खराब झाले असल्यास ते तातडीने दुरूस्त करून घ्यावे, असा सूचना होर्डिंगचालक व मालकांना दिल्या आहेत.
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग…












