न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२५) :- हिंजवडीतील एका सोसायटीत २९ वर्षीय फैजल साफी नामक अफगाणिस्तान देशाचा नागरिक अवैधपणे वास्तव्य करताना आढळला आहे.
त्याची वीजाची मुदत डिसेंबर २०२२ पर्यंत होती. हा अफगाणी नागरिक दि.२३/०२/२०२४ पासून ते दि.१०/०४/२०२५ पर्यंत हिंजवडी येथे राहत होता. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर परकीय नागरिक अधिनियमांतर्गत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.