न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस निरीक्षक, विश्वजीत खुळे, निगडी वाहतूक विभाग यांच्या उपस्थितीत तब्बल 542 सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे.
बुलेट मोटारसायकलचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहन चालकांवर पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेअंतर्गत नियमितपणे कारवाई करण्यात येते. १ जानेवारी ते १० एप्रिल २०२५ रोजी पर्यंत अनाधिकृतपणे वाहनामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या वाहन चालकांवर एकूण ४८५३ केसेस करून ४८,४९,000/- रुपये एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
















