- हल्ल्यात जखमी झाल्याने गमावला जीव..
- श्वान प्रेमींमध्ये संतापाची भावना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- काळेवाडीतील नढेनगर, क्रांतीवीर कॉलनी येथे अंदाजे ५ ते ६ वर्षाच्या बाऊन, काळसर व पांढरा रंग असणाऱ्या कुत्र्याला दोघांनी लाकडी दांडक्याने व दगडांनी मारहाण करण्यात आली आहे. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने मयत झाला आहे. हा प्रकार (दि.१३) रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला आहे.
दरम्यान पिंपरीत भटक्या कुत्र्यांवर विषबाधा करून त्यांना ठार मारण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला असताना आता ही घटना पुढे आल्याने श्वान प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने १) सतिष जडकर २) त्याचा एक मित्र यांच्या विरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलीसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि निलेश नलावडे हे करीत आहेत.
















