न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- स्प्राईटची बॉटल दिली नाही म्हणुन रागाच्या भरात काचेची मोकळी बाटली तरूणाच्या डोक्यात मारुन त्याला जखमी करण्यात आले आहे. ही घटना (दि. १४) रोजी रात्री १०.०० वा सुमारास महाळुंगे कमानी जवळील हॉटेल मोतोश्री येथे घडला आहे. शिवाराज रंगराव वानखेडे याने बालाजी बंडु गाडे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
त्यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही.
















