न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२५) :- रावेत ते किवळे येथे २५ मीटर वाहतुक दळणवळण झोन आरक्षित आहे. या भागात आरक्षण टाकण्यापूर्वीच अनेक घरे अधिकृत आहेत. त्यामुळे हे आरक्षण रद्द करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
किवळे, रावेत ही गावे मनपामध्ये समाविष्ट होण्यापूर्वी किवळे या भागातील एम.बी. कॅम्प, बापदेवनगर, साळुंके वसाहत, श्रीनगर, जनावळे वसाहत व राजाराम नगर येथील नागरिकांनी ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने घरांची बांधकामे केलेली आहेत.
रावेत परिसरातील स्थानिकांच्या जमिनी बीआरटी रस्त्यात गेल्या असून उर्वरीत क्षेत्र दळणवळण झोनिंगमध्ये आल्याने भूमीपुत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. भविष्यात वाहतुक दळणवळण झोन रद्द न झाल्यास या भागातील २८५ बांधकामे बाधित होणार आहेत.
२०२१ मध्ये राज्यातील विविध पक्षांच्या पदाधिकारी यांना स्थानिक नागरिकांनी निवेदन दिले होते. आरक्षणाबाबत उचित कार्यवाही करण्यासंदर्भात सूचनाही दिल्या होत्या. सुचनेनुसार अद्यापही कार्यवाही झाली नाही. आरक्षण रद्द करण्याची मागणी नागरिकांनी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्याकडेही निवेदन देऊन केली आहे.
किवळे-रावेत हद्दीतील दळणवळण झोनिंग आरक्षण हे नाशिक-पुणे रेल्वेसाठी आरक्षित केले होते, परंतु नाशिक-पुणे लोहमार्गाचा मार्ग बदलण्यात आल्याने आरक्षण अनावश्यक आहे. दापोडी ते भेगडेवाडी रेल्वे हद्दीतील इतर भागात अनेक शासकीय आणि खाजगी प्रकल्प झाले आहेत.
– शाम भोसले, स्थानिक नागरिक…
















