न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १८ एप्रिल २०२५) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. १७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथे घडली. दरम्यान, वेळीच सर्व प्रवासी बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.
देहूरोडमधील साईनगर येथून ही बस निगडीच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी होते. ही बस देहूरोड उड्डाणपुलाखाली आली असता बसच्या टायरने अचानक पेट घेतला. स्थानिक व्यापारी तसेच नागरिकांनी बसच्या टायरला लागलेल्या आगीबाबत माहिती चालकाला दिली.
चालकाने तात्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना बसमधून तात्काळ खाली उतरविले. स्थानिक व्यापारी तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी आग नियंत्रण यंत्राच्या मदतीने बसला लागलेली आग तात्काळ नियंत्रणात आणली.
















