न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२५) :- कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या सातव्या वर्धापन दिना निमित्त रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संदिप साळुंखे यांनी दिली.
मागील सात वर्षापासून कोकण खेड युवाशक्ती सामाजिक कार्यात भाग घेत आहे. अनेकांना मदतीचा हात दिला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या सातव्या वर्धापन दिन निमित्त भव्य असे रक्तदान शिबीर घेण्यात येणार असून महिलांसाठी हळदीकुंकू व लकी ड्रॉ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी श्री दत्तमंदिर सांस्कृतिक हॉल, संभाजीनगर, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे होणार असून सकाळी ९ ते १२ या वेळात रक्तदान शिबीर होणार असून सायंकाळी ५ ते ९ या वेळात स्नेहमेळावा होणार आहे. तरी या कार्यक्रमाला कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष संदिप साळुंखे यांनी केले आहे.
















