न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19 एप्रिल 2025) :- स्थायी समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर भालेराव यांच आज शनिवारी (दि. १९) सकाळच्या सुमारास दुःखद निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.
निगडी येथील स्मशानभूमी येथे आज (दि. १९) सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
भालेराव यांनी आकुर्डी गावठाण येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तारूढ पक्षनेता आणि स्थायी समितीचे सभापती पद त्यांनी भूषवले होते.
















