- शहर भाजपा कायदा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२५) :- राज्यभरातील वकिलांच्या समस्या दूर व्हाव्यात आणि त्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात याकरिता शहर भाजपा कायदा आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.
वकिलांच्या विविध मागण्यांचे निवेदन भाजपच्या पिंपरी चिंचवड शहर कायदा आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री तथा विधी न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. कायदा आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे.
या निवेदनात प्रामुख्याने राज्यभरातील कोर्टमध्ये केस लढविण्यासाठी जाव्या लागणाऱ्या वकिलांना संबंधित ठिकाणचे शासकीय विश्रामगृह उपलब्ध करून द्यावे. ज्यूनिअर वकीलांना
किमान पाच वर्षे दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन लागू करावे.
पीएमआरडीएच्या हद्दीत पिंपरी चिंचवड शहरालगत वकिलांच्या हौसिंग सोसायटीकरिता २५ एकर क्षेत्रफळाचा भूखंड राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा. मोशी येथे १६ एकर भूखंडावर न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी येणाऱ्या पक्षकारांची सोय व्हावी, याकरिता याठिकाणी वकिलांच्या कार्यालयांकरिता दोन एकर भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या अॅड. झोळ यांनी निवेदनात
केल्या आहेत.