- मनसेच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२५) :- गेल्या तीन वर्षापासून निगडी प्राधिकरण येथील बंद असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव महापालिकेने सुरू केला आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले याच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या जलतरण तलावाचे पालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, मुख्य क्रीडा अधिकारी अनिता केदारी, रोहन जोशी, मनसे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले, अमरसिंग हिरे, विनायक शेळके, विक्रांत मुकणार यांच्या हस्ते नव्याने तलावाचे उद्घाटन करण्यात आले.
मागील तीन ते चार वर्षापासून तलाव बंद होता. अनेक अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यांना प्रत्यक्षात भेटून मागणी केली. पंधरा दिवसांपुर्वी तलाव चालू करण्यासाठी उपायुक्तांच्या दालनात धरणे आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन तलाव सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.











