न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२५) :- स्टेमसेलमध्ये रिसर्चस्टेमसेलमध्ये रिसर्च करून स्टेमसेल विकसीत करून ते विक्री करण्याचा व्यवसाय करू, असे अमिष एका वेज्ञानिकाने डाॅक्टरला दाखवले. वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळया कंपणी व संस्थेकडुन ऑर्डर मिळाल्याचे भासवत त्यासाठी लागणारे साहित्य, कच्चा माल, तसेच इतर कामासाठी पैशांची गुंतवणुक लागेल असे सांगुन फिर्यादी डाॅक्टरकडून आरोपीने वेळोवेळी रोखीने व बँक ट्रान्सफर अशी एकुण रक्कम रूपये ३०,००,०००/- घेऊन फिर्यादीला कुठलाही मोबदला दिला नाही व फिर्यादीची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सन २०१९ ते आज पावेतो IVF Nest Fertility Clinic या नावाची लॅब, वाकड तसेच लॉजीकल बायोलॉजी लॅब, धायरी येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी डॉ. अमितकुमार पाटील यांनी आरोपी निशांत जगदिश व्यास, (सायंटिस्ट) याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. त्यावरून वाकड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.











