न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२५) :- ‘तु माझ्या मुलासोबत भांडण का केले’ असे बोलुन फिर्यादी खेळाडूला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी हाताने पोटावर, छातीवर व पाठीवर मारहाण करण्यास सुरवात केली. दोन्ही हात पकडुन ठेवले व डाव्या हाताचे पंजावर लाकडी दांडके मारले. फिर्यादीची आई ही भांडणे सोडवण्यासाठी आली तेव्हा आरोपीने तीस शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
केसर ट्री टाउन सोसायटीच्या पार्किंगमध्ये, भारतमाता चौक, मोशी येथे दि ३०/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०८/०० वा. चे दरम्यान हा प्रकार घडला.
चैतन्य विलासराव कवडे देशमुख (वय-२० वर्षे खेळाडू) यांनी आरोपी १) हरी बोराटे वय अंदाजे २१ वर्षे, २) प्रेमनाथ बोराटे यय अंदाजे ४६ वर्षे, ३) संकेत जाधव वय अंदाजे २२वर्षे, ४) ओमकार बोराटे वय अंदाजे २० वर्षे सर्व राहणार भारत माता चौक मोशी, यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.












