न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२५) :- तीन बांगलादेशींनी स्वतःचा जामीन करुन घेण्यासाठी खोटे जामीनदार म्हणुन उपस्थित राहीलेले अनोळखी साथिदार व आरोपींचे वकील यांच्यासह बनावट कागदपत्रे तयार करणारे अनोळखी इसम यांनी संगनमत करीत न्यायालयाची व पोलीस प्रशासनाची फसवणुक केली आहे.
बेकायदेशीरपणे जामीन मिळवत जामीनावर बाहेर आल्यापासुन केव्हाही न्यायालयात केसेससाठी हजर राहिले नाहीत व ते सध्या नमुद पत्त्यावर मिळून सुध्दा येत नाहीत, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार दि.०४/०४/२०२४ ते आज पर्यंत एमआयडीसी भोसरी पो.स्टे बो-हाडेवाडी मोशी, पुणे व मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो, पिंपरी न्यायालय, पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी दहशतवाद विरोधी शाखा, पिंपरी चिंचवड यांनी आरोपी १) महिला आरोपी,२) महिला आरोपी, ३) सम्राट बलाय बाला वय २३ वर्षे, सर्व रा. सहयाद्री बांधकाम साईट, लेबर कॅम्प, बो-हाडेवाडी, मोशी, पुणे मुळगांव ग्राम बहादुरपुर, पो. दतोकन्दवा जि. मदारीपुर बांगलादेश तसेच ४) आरोपीतांचे जामीन करणारे वकील, ५) आरोपींचे अनोळखी साथीदार (बनावट जामीनदार म्हणुन हजर राहिलेले इसम), ६) बनावट कागदपत्रे तयार करणारे अनोळखी इसम व जामीन होणेकामी सहकार्य करणारे इतर संबंधित या सर्वांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.















