न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२५) :- पाच जणांनी संगणमत करीत कार्यालयातुन लेटर हेड चोरी करुन त्यावर बनावट सही करीत फर्मचे नावाचा, खाजगी सुरक्षा अभिकरण परवान्याचा, जीएसटी क्रमांकाचा, पॅन क्रमांकाचा वापर केला.
त्याद्वारे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पवना सहकारी बँक, झोलो प्रॉपर्टीज स्टेट यांना सुरक्षा रक्षक व मनुष्यबळ पुरवुन ०३ कोटी २२ लाख रुपयांचा व्यवसाय केला.
विविध पाच बँक खात्यावर रक्कम स्विकारुन त्यामधुन मिळालेला ०१ कोटी ०३ लाख रुपये नफा कमवला. व्यवसायाचा शासनास जीएसटी, टीडीएस, व इतर कर यांचा भरणा केला नाही. जीएसटीची नोटीस आल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. आरोपी यांनी फिर्यादीचा विश्वासात करुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार दि ०१/०८/२०२२ ते दि. ११/०७/२०२४ दरम्यान खराळवाडी, पिंपरी येथे घडला. फिर्यादी (वय ३२ वर्षे रा लांडेवाडी भोसरी) यांनी आरोपी (१) प्रसाद महादेव दांडगे, वय ३४ वर्षे, (२) महीला आरोपी, वय ३१ वर्षे, (३) महीला आरोपी वय ५५ वर्षे, सर्व रा. चक्रपाणी वसाहत भोसरी, (४) राजेश जयसिलान वेणुगोपाल वय ३५ वर्षे, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव, (५) गोपीनाथ बालाजी दांडगे, वय ३४ वर्षे, रा. भोसरी गाव यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















