न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २३ मे २०२५) :- कंपनीत काम करणारा मशिन मेटेनन्स हेड व त्याचे इतर साथिदार यांनी मशिनरीचा मेंटेनेन्स योग्य पध्दतीने व जबाबदारीने केला नाही.
संगनमताने कंपनीतील व्हीएमसी मशिनचे महत्वाचे नवीन पार्ट काढुन ते बाहेर कुठे तरी विकले. त्या बदल्यात सेम जुने पार्ट बसवुन, पार्टची अदलाबदल केली. फिर्यादीची व कंपनीची दिशाभुल करुन १७,२०,०००/- रुपयांची फसवणुक केली आहे.
तसेच दुरुस्ती दाखवुन कंपनीच्या पैशांचा अपहार केला आहे. तसेच त्यांनी कंपनीचे ऑईल, फिक्चर्स, टुल्स व इतर मशिन्सच्या बाबत देखील केली असण्याची शक्यता आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि ०३) वालीया अॅटो अॅन्सिलेरिज प्रा.लि. चिंचवड एमआयडीसी येथे घडली. फिर्यादी (वय ३५ वर्षे रा जाधववाडी चिखली) यांनी आरोपी पंकज पाटील व त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पिपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















